विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील पारधी पोड (डोंगरगाव) येथे स्वातंत्रदीनी ध्वजारोहण झाले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करून स्वतंत्रदिन साजरा करण्यात आला.
पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस मानवाने जंगल कटाई करून पर्यावरणाचे मानवाने नुकसान केले आहे. त्यामुळे वृक्षारोपण करणे ही आज काळाची गरज होऊन बसली आहे. याचे पालन करीत शाळेद्वारे शाखेच्या प्रांगणात 70 झाडे लावण्यात आलीत. महत्वाचे म्हणजे या झाडांमध्ये सर्व देशी झाडे आहेत. त्यामध्ये सीताफळ, आंबा, चिंच, आवळा, बदाम, जांभूळ, सुबाभूळ ही झाडे आहेत.
यासोबतच ‘एक विद्यार्थी एक झाड’ ही संकल्पना राबवित प्रत्येक विद्यार्थ्यांना घरी झाड लावण्यासाठी प्रत्येकी एक झाड देण्यात आले. निसर्गाचे संरक्षण करण्याचा संदेश पालकांपर्यत पोहचविण्यात आला. या उपक्रमाकरिता स्कूल सपोर्ट टीमने सहकार्य केले. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक विनोद बोरकर व सहशिक्षक विनोद वैरागडे यांनी आभार मानले.