ट्रकने उडवले रेल्वे फाटक, वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंगवरची घटना

काही काळासाठी वरोरा रोडवरील वाहतूक विस्कळीत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मालगाडी येणार म्हणून बंद करण्यात आलेल्या वरोरा रोडवरील रेल्वे फाटकाला एका ट्रकने जबर धडक दिली. आज सकाळी पाऊने 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे वरोरा रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

सकाळी 8.50 ची वाजता एक मालगाडी माजरीहून वणीला येणार होती. त्यामुळे वरोरा रोडवरील रेल्वे फाटक बंद करण्यात येत होते. दरम्यान त्याच वेळी रेल्वे फाटक बंद होणार म्हणून वरोरा रोडवरून वणीच्या दिशेने येणारे ट्रक (MH26 BE2159) चालकाने त्याचे वाहन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात ट्रकने रेल्वे फाटकाला जबर धडक दिली. यात रेल्वे फाटकाचे मोठे नुकसान झाले आहे.

रेल्वे फाटक बंद झाल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने उभी होती. अपघात झाल्याने या मार्गावर काही काळासाठी वाहतुक विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा दिसून आल्या. काही वेळातच या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

अपघातामुळे काही काळ या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या

वरोरा रेल्वे टी पॉइंट बनला अपघाताचा हॉटस्पॉट
रेल्वे स्थानकजवळ दोन रेल्वे सायडिंग आहेत. त्यातून विद्युत प्रकल्पाला कोळसा पाठवला जातो. त्यामुळे या रस्त्यावर कायम ट्रकची रहदारी असते. अनेक ट्रक हे रस्त्यावरच थांबलेले असतात. या टी पॉइंटवर कायमच अपघात होत असतात. अनेकांना तर या अपघातात जीवही गमवावा लागला आहे. मात्र यावर वाहतून पोलिसांचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

कोळशाच्या धुळीमुळे नागरिक त्रस्त
रेल्वे सायडिंग परिसर हा लोकवस्तीला लागून आहे. दिवसातून अनेकदा येथून रेल्वे रॅकची लोडिंग होते. यावेळी मोठ्या प्रमाणात कोळशाची धुळ उडते. शिवाय ट्रक लोडिंगच्या वेळी मोठ्या प्रमाणात डस्ट उडतो. वा-यामुळे हा डस्त परिसरात पसरतो. गौरकर कॉलोनी, विठ्ठलवाडी, देशमुखवाडी, कनकवाडी व प्रगती नगरचा काही भाग या डस्टमुळे प्रभावित झाला आहे. कोळशाच्या हानीकारक धुळीमुळे या परिसरातील रहिवाशांना विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत स्थानिकांनी अनेकदा तक्रारी देखील केल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप स्थानिक करत आहे.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.