शुल्लक वादातून ट्रकमालकासह तिघांची चालकाला काठीने मारहाण

लालपुलिया परिसरातील घटना, तिघांविरोधात गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: एका ट्रकचालकास ट्रकमालकसह तिघांनी काठीने जबर मारहाण केली. मारहाणीत चालक जखमी झाला. सोमवारी दिनांक 4 मार्च रोजी दुपारी लालपुलिया परिसरात ही घटना घडली. रवींद्र बंडू धुर्वे (33) रा. मुंडरा ता. राजुरा जि. चंद्रपूर असे मारहाण झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. या प्रकरणी तिघांविरोधात विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, रवींद्र बंडू धुर्वे (33) हा ट्रकचालक असून तो करण साहानी (35) यांच्याकडे ड्युटी करतो. सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास रवींद्र हा लालपुलिया येथील साई ढाब्याजवळ उभा होता. दरम्यान काही कारणावरून चालक आणि मालकात वाद झाला. ट्रक मालक करण साहानी त्याचा सुपरवायझर संजय (25) रा. बोधेनगर चिखलगाव याने रवींद्र याला काठीने मारहाण केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मारहाणीत रविंद्रच्या डोक्याला व हाताला इजा झाली व रक्तस्त्राव झाला. यावेळी यांच्यासोबत एक अनोळखी इसम वय (20) होता. त्यानेही रविंद्र यास मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांनीच रवींद्र याला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यानंतर जखमीच्या बयानावरून पोहेकॉ दिगंबर किनाके यांच्या फिर्यादीवरून करण साहनी, संजय व एक अनोळखी इसम यांच्याविरुद्ध कलम 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.