वणीतील मटका अड्ड्यावर धाडसत्र, लाखोंचा मुद्देमाल जप्त

दोन ठिकाणी कारवाई, सुमारे 35 ते 40 जणांना अटक.

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील विराणी फंक्शन हॉल जवळील परिसरात जुगार (मटका) सुरू असल्याच्या माहितीवरून एलसीबी पथकाने धाडसत्र राबवल्याची माहिती आहे. एका धाडीत सुमारे 25 ते 30 तर दुस-या धाडीत 8 ते 10 लोकांना ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारार ही कारवाई करण्यात आली. सदर घरून जुगार (मटका) चालवला जात असल्याची टीप यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मिळाली होती. त्या माहितीवरून एलसीबी मागावर होती. अखेर संध्याकाळच्या सुमारास 15 ते 20 जणांचे पथक वणी येथे पोहोचले. त्यांनी 6 वाजताच्या दरम्यान विराणी फंक्शन हॉल जवळ (एकता नगर रोड) येथे दोन ठिकाणी धाड टाकली. या धाडीत सदर ठिकाणाहून जुगार (मटका) चालवला जात असल्याचे आढळून आले. या प्रकऱणी सुमारे 35 ते 40 लोकांना ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच या कारवाईत लाखोंचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.  या प्रकरणी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
(अधिक माहिती येताच बातमी बातमी अपडेट केल्या जाईल.)

Podar School 2025

अपडेटेड बातमी खालील लिंकवर….

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मटका धाड प्रकरणी 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

हे देखील वाचा:

पती नव्हता घरी, संधी साधून केली बळजबरी

Comments are closed.