दुचाकी चोरट्यांचा छडा लावण्याचा आव्हानशहरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्याबरोबरच चोरट्यांचा शोध घेणे वणी पोलिसांसाठी आव्हान आहे. मागील एका वर्षात दुचाकी चोरीच्या शेकडो घटना शहरात घडली. मात्र वणी पोलीस दुचाकी चोरीची तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे आरोप होत आहे. दुचाकी चोरट्यांचा रडारवर हिरोहोंडा स्प्लेंडर, पेशन आणि शाईन मोटरसायकल असून दुचाकी वाहन मालकांच्या मनात दुचाकी चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.
जितेंद्र कोठारी, वणी : भद्रावती येथून कामानिमित्त वणी येथे आलेल्या युवकाची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लांबविली. सदर घटना 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता येथील आंबेडकर चौक भागात घडली. याबाबत दुचाकी मालक आदर्श देवराव कांबळे (34) रा. शिवाजी नगर भद्रावती, जि. चंद्रपूर यांनी बुधवार 7 सप्टेंबर रोजी वणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
तक्रारदार 3 सप्टें. रोजी आपल्या हिरोहोंडा स्प्लेंडर मोटरसायकल क्र. (MH34AF7649) ने कामानिमित्त वणी येथे आला होता. सायंकाळी 6.30 वाजता आंबेडकर चौक परिसरात दुचाकी उभी करून साई कॉम्प्युटर येथे गेला होता. काम आटोपून सायंकाळी 7.15 वाजता दुकानातून बाहेर निघाला असता ठेवलेल्या ठिकाणी मोटरसायकल दिसून आली नाही. तक्रारीवरून वणी पोलिसांनी कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.