शस्त्राच्या धाकावर घातपात व दहशत पसरविण्याच्या डाव पोलिसांनी उधळला

जितेंद्र कोठारी, वणी : शस्त्राच्या धाकावर घातपात तसेच दहशत पसरविण्याचा दोन युवकाचा डाव वणी पोलिसांनी उधळून लावला. शुक्रवार 10 मार्च रोजी रंगनाथ नगर खरबडा मोहल्ला भागात एका घरात धाड टाकून 2 धारदार तलवारी पोलिसांनी जप्त केली. शस्त्र बाळगणारे व पुरवठा करणार्‍या दोन युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. रोहीत राकेश खरे (20) तसेच तलवारी पुरवठा करणारा अयान मंसूरी शौकतअली (19) दोघ रा. रंगनाथ नगर असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे.

घातपातच्या उद्देशाने रंगनाथ नगर येथील एका युवकाजवळ धारदार शस्त्र असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली होती. माहितीवरून स्था. गुन्हा शाखा पथकाने रंगनाथ नगर येथील रोहित राकेश खरे या युवकाच्या घराची झडती घेतली. पोलिसांना घरात लपवून ठेवलेली दोन धारदार तलवारी सापडली. तलवारी कुठून आणली, अशी विचारणा केली असता रोहित यांनी त्याच्याच मोहल्ल्यातील अयान मंसूरी यांनी आणून ठेवल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी अयान मंसूरीला ताब्यात घेतले.  

आरोपी विरुद्ध वणी पोलिस ठाण्यात शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्था.गु.शाखा सपोनि अमोल मुडे, सुनिल खंडागळे, सुधीर पिदुरकर, सुधीर पांडे, रजनिकांत मडावी व नरेश राउत यांनी पार पाडली आहे. पुढील तपास वणी पोलिस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.