इसमाची गळफास घेऊन आत्महत्या, सर्वोदय चौक परिसरातील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सर्वोदय चौक येथे वास्तव्यास असलेल्या एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोष मारोतराव बोरुले असे मृत इसमाचे नाव आहे. आज पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

सविस्तर वृत्त असे की संतोष मारोतराव बोरूले (47) हे मुळचे कायर येथील रहिवासी असून ते मिस्त्रीकाम करायचे. कामानिमित्त ते वणीत कुटुंबीयांसह राहण्यासाठी आले होते. पत्नी, दोन मुलासह ते शहरातील सर्वोदय चौक परिसरात भाड्याने राहायचे. शुक्रवारी दिनांक 10 मार्च रोजी घरातील सर्व जण नेहमीप्रमाणे झोपे गेले होते. आज शनिवारी पहाटे 4.30 वाजता त्यांचा मुलगा कामानिमित्त उठला असता त्यांना त्यांचे वडील खोलीत आढळून आले नाही.

वडील न दिसल्याने त्यांनी दुस-या खोलीत जाऊन बघितले असता मुलाला त्या ठिकाणी वडीलांनी गळफास घेतलेला आढळला. त्यांनी लगेच कुटुंबीयांना उठवले. कुटुंबीयांनी याची माहिती पोलिसांना दिली. सकाळच्या सुमारासस पोलीस घरी पोहोचले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

संतोष यांचा मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. संतोष यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

जीवाची बाजी लावून आगीपासून वाचविले पीक, मात्र गेला जीव

21 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा

वृद्ध दाम्पत्याच्या घरी चोरी, सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास

 

Comments are closed.