सुशील ओझा, झरी: नगरपंचायत अंतर्गत झरी येथील ३६ लोकांना दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर झाले. योजनेचे घरकुल बांधकामही बहुतांश लोकांनी केले. परंतु घरकुलाचा दुसरा हप्ता न मिळाल्याने सर्वांचे काम ठप्प पडले.
दुसऱ्या हप्त्याकरिता दर दर भटकावे लागत होते. परंतु घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्याकरिता जागोम दलांच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन उपोषणास सुरवात केली. तिसऱ्या दिवशीच नगरपंचायतीच्या खात्यात घरकूल लाभार्थ्यांचे दुसऱ्या हप्त्याची 32 लाख 40 हजार रूपये जमा झाले. त्यामुळे उपोषणाची सांगता झाली.
शासनाकडून घरकुल धारकांना बांधकामाचा पहिला टप्पा ४० हजार देण्यात आले. घरकूल लाभार्थी यांनी स्लॅबलेव्हलपर्यंत घरकूल बांधकाम केले. परंतु शासनाकडून दुसरा हप्ता न मिळाल्याने घराचे स्लॅब पडले नाही. ज्यामुळे अनेक लाभार्थी जवळ रहायला घर नाही तर अनेकांना उघड्यावर रहावे लागत आहे. काही लाभार्थी भाड्याच्या घरात राहत होते.
पावसाळ्यात उघड्यावर राहावे लागत असल्याने सर्प, विंचूंमुळे कुटुंबासह लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. घरकूल लाभार्थ्यांनी दुसरा हप्ता मिळावे या करिता यापूर्वीही उपोषण केले होते. उपोषणादरम्यान समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. परंतु अजूनपर्यंत पूर्ण केले नाही.
त्यामुळे त्रस्त झालेले घरकूल लाभार्थ्यांनी 19 ऑक्टोबरपासून बसस्टँड चौकात आमरण उपोषणास सुरवात केली. उपोषण मंडपात कालिदास अरके, गजानन मडावी, राजू शेख व पिंटू सोळंकी हे आमरण उपोषणास बसले. तीन दिवस उपोषणानंतर शासनाकडून 32 लाख 40 हजार रुपये दुसरा हप्त्याचे जमा करण्यात आले व सायंकाळी 6 वाजता उपोषण मागे घेण्यात आले.
नगर पंचायतीमध्ये अध्यक्ष १७ नगरसेवक व सीईओ असून अजूनपर्यंत कोणीही घरकूल लाभार्थ्यांकडे लक्ष देत नव्हते.असा आरोपही उपोषणकर्त्याकडन करण्यात आला. अखेर त्रस्त झाले घरकूल लाभार्थ्यांनी उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाला यश आले.
उपोषणकर्त्यांना नगरपंचायत तसेच लोकप्रतिनिधी व राजकीय पुढारी यांचं कोणतीही मदत न मिळाल्याने मोठी नाराजी होती. आम्ही स्वतःच उपोषण करून स्वतःचे घरकुलाचे दुसरा हप्ते मिळवून घेतल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)