सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेवटच्या टोकावरील तेलंगाणा सीमेजवळील दिग्रस येथे कोविड 19 लसीकरचे करण्यात आले. दिग्रस ग्रामपंचायतचे सरपंच निलेश येल्टीवार यांनी गावकऱ्यांच्या हिताचा विचार करत या बाबतीत पुढाकार घेतला. 5 जून रोजी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने ग्रामवासीयांना लस देण्यात आली.
लस घेण्याकरिता ग्रामपंचायत द्वारे जनतेला आवाहन करण्यात आले होते. जनतेनी लसीकरण करीता मोठा प्रतिसाद दिला. यापूर्वी गावात पहिल्यांदा लसीकरण सुद्धा करण्यात आले त्या लसीकरनाला 56 लोकांना लस देण्यात आली. 5 जून रोजी दुस-यांदा लसीकरण करण्यात आले त्यात 44 असे एकूण 100 लोकांना लस देण्यात आली.
लसीकरण मोहिमेला प्रमुख उपस्थिती सरपंच निलेश येल्टीवार, पोलीस पाटील नंदू कुंटलवार, सचिव कैलास जाधव ग्रा प सदस्य नरेश कावटवार कर्मचारी उपेश कुंटलवार, महेश कावटवार,शेखर पलावार, तंटामुक्ती अध्यक्ष रजनीकांत सुरकुंटवार व आरोग्य विभागाचे विद्या बावनकुळे,तपासीन शेख फरीद, रेणुका कावटवार होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता अशोकरेड्डी सुरकुंटवार, सुरेश पालावार, विठ्ठल येन्नावार, जालंदररेड्डी गड्डमवार, प्रवीणरेड्डी गड्डमवार, जितू साकपेल्लीवार, राजू नल्लवार, विमल सुरकुंटवार, चेतन येन्नावार, श्रीकांत तुमाने व विनोद तुमाने यांनी परिश्रम घेतले.
हे देखील वाचा:
तेलंगणात रेती तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात