वणी पब्लिक स्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

वणी बहुगुणी, डेस्क: शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या वणी पब्लिक स्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविद्यालयात विज्ञान आणि कॉमर्स शाखा (इंग्रजी माध्यम) असून 10 वी पास असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांना 11 वी साठी प्रवेश (स्पॉट ऍ़डमिशन) घेता येणार आहे. विज्ञान शाखा घेणा-यांसाठी या महाविद्यालयात मॅथ ऐवजी समाजशास्त्र विषय घेण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे पीसीबी ग्रुपची किंवा मेडिकलची तयारी करण्या-या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे. तर इंजिनिअरिंगची तयार करणा-या विद्यार्थ्यांसाठी बॉयोलॉजी ऐवजी किंवा कॉम्प्युटर सायंस घेण्याची सुविधा देखील आहे. यामुळे एक भाषा विषय सुटून मार्क्स स्कोरिंग वाढते. तर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय देखील घेता येऊ शकतो. सीएची तयारी करणा-यांसाठी याचा मोठा फायदा होतो. विशेष म्हणजे 100 टक्के निकालाची या कॉलेजची गेल्या काही वर्षांची परंपरा राहिली आहे. त्यामुळे वणी पब्लिक स्कूल म्हणजे विद्यार्थ्यी हमखास पास असे एक समीकरणच बनले आहे. प्रवेशासाठी सकाळी 9 वाजता ते दुपारी 3.30 पर्यंत कॉलेजच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

महाविद्यालयाची वैशिष्ट्ये
वणी पब्लिक स्कूल ज्युनिअर कॉलेज हे निसर्गरम्य परिसरात असून महाविद्यालयात शिकवण्यासाठी प्रशिक्षित प्राध्यापक आहेत. सुसज्ज असे वर्ग, सर्व सोयीसुविधा असलेली प्रयोगशाळा, 100 टक्के निकालाची परंपरा देखील या महाविद्यालयाची राहिली आहे.

उत्कृष्ट रिझल्ट हीच यशाची पावती – प्राचार्य
गेल्या अनेक वर्षांपासून कॉलेजचा उत्कृष्ट निकाल आहे. अनेकदा कॉलेजचा निकाल 100 टक्के आहे. अनेक वर्षी तर आमच्या कॉलेजमधूनच शहरातील टॉपर असतात. तर कधी टॉप 3 मध्ये. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं हेच आमच्या यशाचे गमक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तात्काळ प्रवेश घ्यावा.
– प्राचार्य, वणी पब्लिक स्कूल ज्युनिअर कॉलेज

अधिक माहितीसाठी संपर्क-
वणी पब्लिक स्कूल ज्युनिअर कॉलेज
पी-1, MIDC एरिया, वणी जिल्हा यवतमाळ
वेळ – स. 9 ते दु. 3.30 वाजेपर्यंत, सुटीच्या दिवशी बंद

Comments are closed.