वेदा रेस्टॉरन्टमध्ये आजपासून पावभाजी व साउथ इंडियन कॉर्नर सुरू

देशविदेशातील विविध डिशसह आता पावभाजी , वडापाव व साउथ इंडियन डिशचा घेता येणार वणीकरांना आनंद.... राम शेवाळकर परिसर येथील वेदा रेस्टॉरन्टमध्ये एकदा भेट देण्याचे आवाहन

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सुप्रसिद्ध वेदा या रेस्टॉरन्ट चेनची नवीन ब्रँच वेदा (प्युर वेज) रेस्टॉरन्ट शहरातील शेवाळकर परिसर येथे काही दिवसांआधी सुरू झाली. वणीतील खवय्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादानंतर या रेस्टॉरन्टमध्ये वणीकरांना आता साऊथ इंडियन डिशेस, मुंबईची प्रसिद्ध पावभाजी व वडापावचा आस्वाद घेता येणार आहे. इथे बुधवारपासून साऊथ इंडियन डिश व पावभाजी कॉर्नर सुरु करण्यात आले आहे. साऊथ इंडियन डिशमध्ये प्लेन डोसा, मसाला डोसा, स्पेशल डोसा, चिज दोसा, म्हैसुर दोसा, इडली, सांबार वडा, उत्तपम तसेच पावभाजी, वडापाव इत्यादी डिश मिळणार आहे. विशेष म्हणजे साऊथ इंडियन डिश तयार करण्यासाठी पाँडिचेरी येथील शेफची टीम बोलवण्यात आली आहे. तीन माळ्यांच्या वेदा या सुसज्ज रेस्टॉरन्टमध्ये 160 ग्राहकांची बैठक व्यवस्था आहे.  

वणी शहरात चांगलेच मुरलेले खवय्ये आहे. शिवाय पारंपरिक डिश सोडल्या तर त्यापेक्षा अधिक आणि नवीन डिश शहरात उपलब्ध नाही. स्पेशल शेफ उपलब्ध नसणे किंवा अप्रशिक्षित शेफ यामुळे नवीन डिश व टेस्ट खवय्याना मिळत नाही. फक्त चांगल्या टेस्टसाठी आणि नवीन डिशसाठी खवय्ये वणीतून चंद्रपूर, नागपूर, अदिलाबाद येथे जातात. खवय्यांची ही गरज लक्षात घेऊन वेदा रेस्टॉरन्टमध्ये विविध नवनवीन डिश ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या विविध डिश बनवण्यासाठी दिल्ली, बंगलोर, मुंबई व पाँडीचेरी येथील स्पेशल शेफची टीम बोलावण्यात आली आहे. त्यामुळे चांगली टेस्ट आणि नवीन डिशसाठी वणीकरांसाठी इतर ठिकाणी जाण्याचा वेळ तर वाचणार आहे शिवाय पैशाची बचत देखील होत आहे. 

काय उपलब्ध आहेत खवय्यांसाठी ?
वेदा रेस्टॉरन्टमध्ये पंजाबी, महाराष्ट्रीयन डिश, कॉन्टीनेन्टल, चायनीय, साउथ इंडियन डिश उपलब्ध आहेत. याशिवाय देश विदेशातील अधिकाधिक डिश उपलब्ध करण्यात आल्या आहेत. साउथ इंडियन डिश या पाँडिचेरी येथील शेफच्या टीमद्वारा बनवल्या जात आहे. तर पंजाबी डिश या दिल्लीतील शेफच्या टीमद्वारा बनवल्या जात आहेत. तंदुरच्या विविध डिश आणि चाटचे विविध प्रकारही येथे चाखायला मिळणार आहे. जेवणानंतर आईसक्रिम, ज्युस, शेक, मॉकटेलचा आनंदही ग्राहकांना या ठिकाणी घेता येणार आहे. सोबतच टेकअवे व पार्सल सुविधाद्वारेही ग्राहकांना वेदा येथील डिशचा आस्वाद घेता येणार आहे. 

फॅमिली पार्टी, ग्रुप पार्टीसाठी विशेष व्यवस्था
वेदा रेस्टॉरन्ट हे तीन माळ्याचे सुसज्ज असे रेस्टॉरन्ट आहे. यात 160 जणांची एकाचवेळी बैठक केली जाऊ शकते. तळमजल्यावर लाईव्ह किचन आहे. तर पहिला व दुसरा माळ्यावर बैठक व्यवस्था केली आहे. रेस्टॉरन्टच्या खुल्या जागेतही खवय्यांना गार्डन बैठकीचा आनंद घेत जेवण करता येणार आहे. यासह बर्थ डे, ऍनिवर्सरी इत्यादी स्पेशल ओकेशन, फॅमिली पार्टी, ग्रुप पार्टी, मिटिंगसाठी वेगळी व्यवस्था ग्राहकांना मिळणार आहे.

शहरातील तसेच परिसरातील खवय्ये तसेच फॅमिलीने एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन संचालक अभिजित (अखिल) सातोकर, अतिश सातोकर यांच्याकडून करण्यात आले आहे.

पत्ता:  वेदा प्युर वेज रेस्टॉरन्ट  
राम शेवाळकर परिसर, यवतमाळ रोड वणी, अधिक माहितीसाठी संपर्क: 9730894567

Comments are closed.