वेदा रेस्टॉरन्टमध्ये रविवारपासून व्हेज सह घ्या नॉनव्हेजचा आनंद

नॉनव्हेजच्या विविध तंदूर डिशसह कोलीवाडा डिश, लखनवी बिर्याणी राहणार प्रमुख आक र्षण... बार्बिक्यू स्टाईल अनलिमिटेड व्हेज, नॉन व्हेज कॉम्बोचा घेता येणार आस्वाद

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सुप्रसिद्ध वेदा या रेस्टॉरन्ट चेनची शेवाळकर परिसर येथील ब्रँचमध्ये रविवारी दिनांक 17 डिसेंबर पासून वेज सोबतच विविध नॉन व्हेज डिशचा देखील आनंद घेता येणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेली लखनवी बिर्याणी, मुंबईची सुप्रसिद्ध डिश कोलीवाडा (प्रान्झ, चिकन, मटण), यासह पापलेट व तंदुरीच्या विविध नॉनव्हेज डिशचा आस्वाद खवय्यांना घेता येणार आहे. अवघ्या 499 रुपयांमध्ये नॉनव्हेज कॉम्बो डिश तर 399 रुपयांमध्ये व्हेज कॉम्बो डिश हे या रेस्टॉरन्टचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. यासाठी मुंबई, लखनऊ, दिल्ली, बेंगलोर येथील स्पेशल शेफची टीम सज्ज झाली आहे. येत्या रविवारपासून वेज सह नॉन व्हेज डिशचा तसेच स्पेशल डिशचा वणी व परिसरातील खवय्यांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन वेदा रेस्टॉरन्टचे संचालक सातोकर बंधू यांनी केले आहे.

वेदा स्पेशल व्हेज, नॉन व्हेज कॉम्बो डिश
परिसरातील खवय्यांची मागणी लक्षात घेऊन वेदा रेस्टॉरन्टमध्ये फक्त 499 रुपयांमध्ये अनलिमिटेड नॉन व्हेज कॉम्बो डिश मिळणार आहे. यात जेवणाआधी चिकन मनचाऊ सूप, तर स्टार्टरमध्ये चिकन चिली, चिकन 65, तंदूरी चिकन, फ्राय फिश, चिली पनिर, चिली चना, नुडल्स, मंचुरियन मिळणार आहे. तर मेन कोर्समध्ये चिकन डिश, पनिर डिश, एक व्हेज डिश,  डाळ, राईस, रोटी, सलाद, पापड, लोणचं इत्यादींचा समावेश आहे. तर अनलिमिटेड कॉम्बो व्हेज मध्ये जेवणाआधी टोमॅटो/व्हेज मनचाऊ सूप, स्टार्टरमध्ये क्रिस्पी चिली बेबी कॉर्न, चिली पनिर, व्हेज मंचुरिअन, चिली चना, व्हेज नुडल्स, फ्रेन्च फ्राईज, तंदूरमध्ये पनिर टिक्का तर मेन कोर्समध्ये पनिर डिश, एक व्हेज डिश, डाळ, राईस, रोटी, सलाद, पापड, लोणचं इत्यादींचा समावेश आहे.

वणी शहरात चांगलेच मुरलेले खवय्ये आहे. शिवाय पारंपरिक डिश सोडल्या तर त्यापेक्षा अधिक आणि नवीन डिश शहरात उपलब्ध नाही. स्पेशल शेफ उपलब्ध नसणे किंवा अप्रशिक्षित शेफ यामुळे नवीन डिश व टेस्ट खवय्याना मिळत नाही. फक्त चांगल्या टेस्टसाठी आणि नवीन डिशसाठी खवय्ये वणीतून चंद्रपूर, नागपूर, अदिलाबाद येथे जातात. खवय्यांची ही गरज लक्षात घेऊन वेदा रेस्टॉरन्टमध्ये विविध नव नवीन व्हेज, नॉनव्हेज डिशचा आनंद खवय्यांना येथे घेता येणार आहे.

खवय्यांसाठी काय असणार ?
वेदा रेस्टॉरन्टमध्ये पंजाबी, महाराष्ट्रीयन डिश, कॉन्टीनेन्टल, चायनीय, साउथ इंडियन डिश उपलब्ध आहेत. याशिवाय देश विदेशातील अधिकाधिक डिश उपलब्ध करण्यात आल्या आहेत. साउथ इंडियन डिश या स्पेशल साउथच्या शेफच्या टीमद्वारा बनवले जाणार आहे. तर पंजाबी डिश या दिल्लीतील शेफच्या टीमद्वारा बनवल्या जाणार आहेत. तंदुरी चिकन, टिक्का, तसेच विविध तंदूरच्या व्हेज, नॉन व्हेज डिश येथे उपलब्ध आहेत. जेवणानंतर आईसक्रिम, ज्युस, शेक, मॉकटेलचा आनंदही ग्राहकांना या ठिकाणी घेता येणार आहे. सोबतच टेक अवे व पार्सल सुविधाद्वारेही ग्राहकांना वेदा येथील डिशचा आस्वाद घेता येणार आहे. 

फॅमिली पार्टी, ग्रुप पार्टीसाठी विशेष व्यवस्था
वेदा रेस्टॉरन्ट हे तीन माळ्याचे सुसज्ज असे रेस्टॉरन्ट आहे. यात 160 जणांच्या एकाचवेळी बैठकीची व्यवस्था आहे. तळमजल्यावर लाईव्ह किचन आहे. तर पहिला व दुसरा माळ्यावर बैठक व्यवस्था केली आहे. रेस्टॉरन्टच्या खुल्या जागेतही खवय्यांना गार्डन बैठकीचा आनंद घेत जेवण करता येते. यासह बर्थ डे, ऍनिवर्सरी इत्यादी स्पेशल ओकेशन, फॅमिली पार्टी, ग्रुप पार्टी, मिटिंगसाठी वेगळी व्यवस्था ग्राहकांना येथे मिळते.

शहरातील तसेच परिसरातील खवय्ये तसेच फॅमिलीने एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन संचालक अभिजित (अखिल) सातोकर, अतिश सातोकर यांच्याकडून करण्यात आले आहे.

पत्ता:  वेदा वेज, नॉनव्हेज रेस्टॉरन्ट                        
राम शेवाळकर परिसर, यवतमाळ रोड वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: 9730894567

Comments are closed.