बहुगुणी डेस्क, वणी: विदर्भ साहित्य संघाचे 66 वे संमेलन या वर्षी वणी येथे होणार आहे. 19 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत हे सम्मेलन रंगणार आहे. या सम्मेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध महाकवी सुधाकर गायधनी यांची तर स्वागताध्यक्ष म्हणून या विभागाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सोबतच कार्यक्रमाला प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
नगर वाचनालयाच्या इमारतीत आ. बोदकुरवार याच्या हस्ते या संमेलनाच्या कार्यालयाचे उदघाटन दि. 17 डिसेंबरला करण्यात आले. वणी येथे या आधी 1970 साली 29 वे विदर्भ साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल 47 वर्षानंतर विदर्भाच पुणं म्हणून ओळखलं जात असलेल्या वणी नगरीतील राम शेवाळकर परिसरात दि.19 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत हे सम्मेलन होणार आहे.
विदर्भ साहित्य संमेलनाचे आयोजन विदर्भ साहित्य संघ शाखा वणी तर्फे करण्यात येणार आहे. या तीन दिवसीय संमेलनामुळे वणी विभागातील नागरिकांना उत्तमोत्तम कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे.