विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा रद्द

घरातच राहून कोविडच्या पराभवासाठी सूरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ द्यावे

0

जितेंद्र कोठारी, वणी: येथील जत्रा मैदान परिसरात दरवर्षी होणार विजयादशमी व रावणदहन सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. विजयादशमीला वणीकर जनता मोठ्या प्रमाणात जत्रा मैदानावर एकत्र येतात. येथील सीमोल्लंघनाला शतकाची परंपरा आहे.

पंजाब सेवा संघ, पंजाब नवयुवक मंडळ व पंजाबी महिला मंडळ द्वारा गेल्या सहा दशकांहून अधिक काळापासून विजयादशमी उत्सव साजरा करतात. परंतु कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाच्या सूचनेनुसार यंदाचा विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा रद्द करण्यात आला आहे.

वणीकरांनी विजयादशमीच्या दिवशी घरातच राहून कोविडच्या पराभवासाठी सूरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ द्यावे. प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन पंजाब नवयुवक मंडळाचे अध्यक्ष डॉ. नीलेश चचडा यांनी केले आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.