गळफास घेऊन मजुराची आत्महत्या

टाकळी (कुंभा) येथील घटना

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात सतत होत असलेल्या आत्महत्यांच्या घटनांनी अवघा तालुका हादरला आहे. शनिवारी पुन्हा तालुक्यातील कुंभानजीक असलेल्या टाकळी येथे वर्धा जिल्ह्यातील एका मजुराने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना 24 ऑक्टोबर सकाळी उघडकीस आली.

अजय कपाटे (40) रा. कलमडोह जिल्हा वर्धा असे मृत मजुरांचे नाव आहे. तालुक्यात कापूसवेचणीकरिता बाहेर जिल्ह्यातील शेकडो मजूर आले आहे. मृतक हा टाकळी येथील एका शेतकऱ्याकडे कापूसवेचणीकरिता आला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तो शेतातील बंड्यावर राहत होता. त्याच बंड्यावर शेतकऱ्याचा सालगडीसुद्धा राहत होता. मात्र शनिवारी सकाळी सालगडी उठताच त्याला अजयचा मृतदेह बंड्यालगतच्या झाडाला लटकलेला दिसला.

त्याने तत्काळ या घटनेची माहिती शेतकऱ्यास दिली. शेतकऱ्यांने मारेगाव पोलिसांना तत्काळ कळविले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. प्रेत शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय मारेगावात दाखल केले. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

Leave A Reply

Your email address will not be published.