वेकोलीच्या इंजिनिअरकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

भालर येथील घटना, शिरपूर पोलिसात तक्रार

0

वि. मा. ताजने, वणी: वेकोलीच्या भालर वसाहतीतील एका १४ वर्षीय अल्पवयीन शालेय मुलीचा विनयभंग केल्याची घटना ३० सप्टेंबरला घडली. याबाबत १२ ऑक्टोबरला शिरपूर पोलिसात सदर मुलीद्वारा फिर्याद दाखल करण्यात आली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी फिर्यादी मुलगी आपल्या मैत्रिणी सोबत शिकवणीला जात होती. दरम्यान वेकोलीच्या उकणी खाणीत इंजिनिअर असलेला अजितकुमार मिश्रा यांनी सदर मुलीला रस्त्यात थांबवून अश्लिल भाषा वापरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी आरोपी अजीत कुमार मिश्रा वय ५० याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४,३५४ (ड), ३४१ सह कलम १२ बाल लैंगिक अत्याचार अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सतीश चवरे, पोलिस प्रमोद जुणूनकर, योगेश ढाले, संजय खांडेकर आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!