वाचनप्रेरणादिनानिमित्त ‘जगू कविता: बघू कविता’  मंगळवारी

अशोक महाविद्यालयाच्या मराठी विभाग आणि ग्रंथालयाचा चांदूर रेल्वेत संयुक्त उपक्रम

0 128

बहुगुणी डेस्क, चांदूर रेल्वे: स्व. मदनगोपाल मुंदडा कला, वाणिज्य आणि अशोक विज्ञान महाविद्यालयात वाचनप्रेरणादिन आणि मराठी अभ्यासमंडळाचं उद्घाटन मंगळवारी दुपारी 12 वाजता होत आहे. या निमित्त ख्यातनाम निवेदक, कवी, साहित्यिक, स्तंभलेखक सुनील इंदुवामन ठाकरे यांचा ‘जगू कविता: बघू कविता’ हा कार्यक्रम होईल. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयंत कारमोरे राहतील. महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि ग्रंथालयाच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं आहे. विभागप्रमुख प्रा. प्रभावती विहिरे आणि प्रा. सुषमा मावंदे यांनी या उपक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.

Comments
Loading...