Lodha Hospital

पती नव्हता घरात, म्हणून त्याने केला घात

गणेशपूर येथील महिलेचा विनयभंग

0

सुशील ओझा,झरी:- मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेशपूर येथील आजारी महिलेच्या घरात घुसून विनयभंग केल्याची घटना घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा निवड करून आरोपीस अटक करण्यात आली. पीडितेचा पती घरात नसल्याचे पाहून आरोपीने हा ‘पराक्रम’ केला.

गणेशपूर येथील एक महिला 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता प्रकृती चांगली नसल्याने घरी एकटीच होती. श्रीनिवास येलेंना यादनवार (42) हा महिला एकटी असल्याचे पाहून महिलेच्या घरात घुसला. मामा कुठे गेले असे बोलत सदर महिलेला शरीरसुखाची मागणी केली. तू मला खूप आवडते, असे म्हणत महिलेशी अश्लील चाळे केले. महिलेने आरडाओरड केली असता श्रीनिवास महिलेला धमकी देऊन पळून गेला.

Sagar Katpis

सायंकाळी महिलेचा पती घरी येताच तिने घडलेली हकीकत सांगितली. पतीसोबत महिलेने मुकुटबन पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी श्रीनिवास यादनवार याच्या विरुद्ध कलम 354,452, 323, 504 व 506 अंतर्गत गुन्हे दाखल केलेत. आरोपीस अटक केली. अधिक तपास ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड, राम गडदे, मोहन कुडमेथे व जितेश पानघाटे करीत आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!