आज शनिवारी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण

तालुक्यात 35 ऍक्टिव्ह पॉजिटिव्ह रुग्ण

0

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 17 ऑक्टोबर रोजी तालुक्यात 7 कोरोना पॉजिटिव्ह निघालेत. यात विठ्ठलवाडी 2, चिखळगाव1, निवली1, शिवाजी चौक1, तर 2 इतर ( वरोरा1 ,घुघस1) यांचा समावेश आहे. आज शनिवारी आलेल्या अहवालानुसार कोरोना बाधितांची एकूण संख्या 696 झाली आहे.

आज यवतमाळहून 25 रिपोर्ट प्राप्त झालेत. यात 7 व्यक्ती पॉजिटिव्ह तर अन्य व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 32 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे पाठवण्यात आले. अद्याप 65 स्वॅबचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

तालुक्यात 35 ऍक्टिव्ह पॉजिटिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 696 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 661 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 35 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या 20 आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आज 1 कोरोनामुक्त व्यक्तीला सुट्टी देण्यात आली. सध्या 12 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 16 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 6 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 12 व्यक्ती भरती आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

Leave A Reply

Your email address will not be published.