प्रभू विश्वकर्मांच्या जयघोषांनी दुमदुमली वणी नगरी

विविध कार्यक्रमांसह जयंती उत्साहात साजरी

बहुगुणी डेस्क, वणी: प्रभू विश्वकर्मा हे विश्वाचे इंजिनिअर मानले जातात. आपल्या हस्तकौशल्यानं आणि प्रतिभेनं नवनिर्मिती करणाऱ्यांचं ते आराध्य दैवत आहे. या प्रभू विश्वकर्मांची जयंती मयात्मज विश्वकर्मामय झाडें सुतार समाज संस्था, महिला मंच, युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने दर वर्षाप्रमाणे याही वर्षाला गुरुवार दिनांक २२ फेब्रुवारीला साजरी करण्यात आली. यानिमित्त अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. शहरातील घराघरांत, चौकाचौकांत रांगोळ्या काढण्यात आल्यात. सजावटी झाल्यात. सगळ्यांचाच उत्साह वाखाणण्यासारखा होता,

सुतार समाजचे आराध्य दैवत तथा शस्त्रांचे देव म्हणून प्रभू विश्वकर्मा ओळखले जातात. पुराणांच सांगितल्यानुसार रावणाची सोन्याची लंका, पांडवांचे महाल अशा अनेक वास्तूंची निर्मिती प्रभू विश्वकर्मा यांनी केली आहे. विश्वावातील पहिले इंजिनियर म्हणूनदेखील प्रभू विश्वकर्मा यांना ओळखलं जातं. त्यांच्या जयंती निमित्त सकाळपासूनच विविध कार्यक्रम झालेत. सकाळी रांगोळी स्पर्धा झाली. नंतर ध्वजारोहण झालं.अध्यक्ष अमन अशोकराव बुरडकर यांच्याहस्ते प्रभू विश्वकर्मा यांच्या मूर्ती आणि प्रतीमेचं पूजन झालं. त्यानंतर महादेव मंदिर, सुतारपुरा- नटराज चौक – म. गांधी – जटाशंकर चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – टागोर चौक – सर्वोदय चौक – वि. दा. सावरकर चौक – भगतसिंग चौक – जमा मशीद समोरून – गाडगे बाबा चौक – नटराज चौक अशी शोभायात्रा काढण्यात आली. महादेव मंदिर सुतारपुरा येथे याचा समारोप झाला. शोभयात्रेत बँड पथक, अतषबाजीनं सर्वांचं लक्ष वेधलं.

श्री प्रभू विश्वकर्मा यांचं पूजन आचल व राहुल जनार्धन वांढरे यांच्या हस्ते झालं. महिलांकरीता हळदीकुंकू कार्यक्रम झाला. प्रभू विश्वकर्मा जयंती कार्यक्रम कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश गहुकर होते. उद्घाटन सुतार समाज वणीचे माजी सचिव प्रकाश राखूडे यांनी केलं. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विजयबाबू चोरडीया, एकविरा महिला ग्रामीण सह. पतसंस्थेच्या अध्यक्ष किरण संजय देरकर, मारेगांव येथील किसन आनंदराव दुधलकर,अमन अशोकराव बुरडकर, मंगला प‌द्माकरजी झिलपे, रूपक संजय अंड्रस्कर, लता सुनील झिलपे, हर्षल हरीचंद्रजी घोंगे सदस्यआदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमचे सूत्रसंचालन पत्रकार पुरुषोत्तम नवघरे यांनी केले.

यावेळी समाजरत्न पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्यात आला. यात या वर्षीचा सुतार समाजरत्न पुरस्कार मनोहर नामदेवराव वांढरे यांना देण्यात आला.समाजातील चिमुकल्यांकरिता सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यात अनेक चिमुकली सहभागी झालीत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता अमन बुरडकर, प्रशांत झिलपे, शालिकराव दूधलकर, गोविंदा निवलकर, विजय जयपूरकर, राजेंद्र मुरस्कर, किशोर बुरडकर, राजेंद्र नवघरे, राहुल वांढरे, हर्षल घोंगे, शुभम झिलपे, रितेश साखरकर, निखिल झिलपे, किशोर झिलपे, दीपक झिलपे, प्रफुल झिलपे, तोषित झिलपे, अक्षय झिलपे, रितिक झिलपे,आदी सुतार समाज बंधू आणि भगिनींनी मदत केली.

Comments are closed.