जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर नियम लागू केले आहेत. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा आणि भाजीपाला, दूध विक्री सुरू आहे. मात्र, असे असतानाही वणी येथील विश्वामित्र बारमधून लपून छपून मद्यविक्री सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
येथील नांदेपेरा रोडवरील विश्वामित्र बारमधून 11 वाजल्यानंतरही मागील दारातून दारु विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिली. माहितीच्या आधारे अबकारी अधिकाऱ्यांनी पोलिसांसह रात्री 7.30 वाजता दरम्यान बारवर धाड टाकली. तेव्हा बारमधून ग्राहकांना बिअर व इंग्रजी दारूची विक्री असल्याचे आढळून आले.
बातमी लिहेपर्यंत बारमधील मद्य साठ्याचे स्टॉक घेणे सुरू होते. लॉकडाउन नियमांतर्गत कारवाईसाठी महसूल व नगरपरिषद अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. विश्वामित्र बारला सील ठोकून दंडात्मक कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे.
Update:
आताच आलेल्या माहितीनुसार बार चालकावर 50 हजारांचा दंड आकारण्यात आला असून बार सिल करण्यात आला आहे. बार संचालक वीरेंद्र जैस्वाल विरुद्ध लॉकडाउन व संचारबंदी नियम 188 व 269 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे
सदर कार्यवाही पीएसआय गोपाल जाधव, प्रभारी मुख्याधिकारी महेश रामगुंडे, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पाद शुल्क एन.के. सुर्वे, नायब तहसीलदार रवींद्र कापशीकर, डीबी पथक कर्मचारी सुधीर पांडे, सुनील खंडागळे व पथकाने पार पाडली.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
5 महिन्यातच मोडला प्रेमाचा करार, प्रेयसीला गर्भवती करून प्रियकर फरार