नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात शहर वगळता आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज 31
में रोजी तालुक्यात केवळ 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यात एका ग्रामीण भागातील महिला पॉझिटिव्ह रुग्णाचा समावेश आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील 50 रुग्णांनी कोरोनावर मात करत बरे होऊन घरी परतले आहे.
आज आरोग्य विभागाने 43 व्यक्तींचे रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली असता त्यात केवळ एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. तसेच आज 162 व्यक्तींची आरटीपीसीआर टेस्ट केली असता ते यवतमाळ येथे तपासणीकरिता पाठवण्यात आले आहे. तसेच 312 व्यक्तीचे रिपोर्ट पेंडिंग आहे.
तालुक्यात सध्या 101 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंट वर 20 रुग्ण उपचार घेत आहे तर 70 होम आयसोलेट आहे. डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरवर 5 तर 6 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.आज 50 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा