अवघ्या 6 मताने विजय ! प्रभाग क्रमांक 4 ते 6 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल

भाजपने पुन्हा मारली बाजी... काँग्रेसने उघडले खाते. पाहा संपूर्ण निकाल... फक्त वणी बहुगुणीवर...

बहुगुणी डेस्क, वणी: दुस-या फेरीत प्रभाग 4 ते 6 या प्रभागाची मतमोजणी झाली. यात पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली. भाजपच्या प्रभाग क्रमांक 4 व 5 मधल्या चारही जागा निवडून आल्या आहे. तर प्रभाग क्रमांक 6 मध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली. प्रभाग 6 अ मध्ये काँग्रेसने विजय मिळवत खाते उघडले आहे. तर 6 ब मध्ये शिवसेना उबाठा विजयी झाली आहे. विशेष म्हणजे 6 बची निवडणूक खूपच चुरशीची ठरली. अवघ्या 6 मतांनी अनिल बदखल यांनी भाजपचे उमेदवार विलास डवरे यांचा पराभव केला. तर प्रभाग 5 अ मध्ये भाजपच्या सोनाली निमकर यांनी 1 हजार पेक्षा अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

दुस-या फेरी अखेर भाजपने चांगलीच आघाडी घेतली असून भाजपने 12 पैकी 7 जागेवर बाजी मारली आहे तर महाविकास आघाडीने 4 जागांवर विजय मिळवला आहे. यात 3 जागांवर शिवसेना उबाठाने तर एका जागेवर काँग्रेस विजयी झाली आहे. एक जागा अपक्षाकडे आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दुस-या फेरी अखेर भाजपच्या विद्या खेमराज आत्राम या 2100 मतांनी आघाडीवर आहेत. जाणून घ्या कुणाला किती मते मिळाली.

प्रभाग क्रमांक 4 अ
स्नेहा प्रतिक खैरे – शिवसेना – 321
ललिता भाऊराव तेलतुंबडे – वंचित बहुजन आघाडी – 164
अर्जना संजय पुनवटकर – भाजप – 1125
मेघा सुधीर पेटकर – शिवसेना (उ. बा. ठा.) – 531

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रभाग क्रमांक 4 ब
वसंता विठ्ठल गायकवाड – अपक्ष – 100
नारायण शाहुजी गोडे – आम आदमी पार्टी – 69
प्रवीण शेषराव ढोके – शिवसेना (उ. बा. ठा.) – 733
निलेश मधुकर परगंटीवार – शिवसेना – 236
राकेश लक्ष्मण बुग्गेवार – भाजप – 959
सागर अशोकराव मुने – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – 66 (नोटा 15)
________________________________________

प्रभाग क्रमांक 5 अ
अर्जना सुभाष ताजणे – शिवसेना (उ. बा. ठा.) – 541
सोनाली प्रशांत निमकर – भाजप –  1579
गीता सचिन पडोळे – शिवसेना – 351 (नोटा 32)

प्रभाग क्रमांक 5 ब
संदीप मुरलीधर खोब्रागडे – शिवसेना – 506
किशोर काशीनाथ गिरडकर – आम आदमी पार्टी – 15
गौतम दिलीप जीवने – काँग्रेस – (हात) – 559
रितीक लक्ष्मण मामीडवार – भाजप – 1141
कपिल भास्कर मेश्राम – अपक्ष – (कपाट) – 133
रामेश्वर शुक्राचार्य लोणारे – वंचित बहुजन आघाडी – 130 (नोटा 19)

_____________________________________

प्रभाग क्रमांक 6 अ
प्रिया अनुप काटकर – अपक्ष – 131
करुणा रविंद्र कांबळे – काँग्रेस – 758
धम्मदीन हरीष पाते – भाजप – 632
प्रणोती हेमंत बांगडे – शिवसेना – 229
रूपाली नारायणराव लोहकरे – वंचित बहुजन आघाडी – 198
सुनीता गणेश सोनकर – अपक्ष – 96 (नोटा 35)

प्रभाग क्रमांक 6 ब
मुकुंदा विद्याधर किटकुले – अपक्ष –  186
गंगासिंग गुरुदयालसिंग चव्हाण – अपक्ष – 52
महेश गंगाधर टिपले – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – 23
विलास मारोतराव डवरे – भाजप –433
अनिकेत अनिल बदखल – शिवसेना (उ. बा. ठा.) – 439
सिद्धार्थ दिलीप मून – वंचित बहुजन आघाडी – 292
प्रमोद गोकुळ लोणारे – अपक्ष – 393
वर्षा अनिल सातपुते – शिवसेना – 247 (नोटा 14)
________________________________________़

जाणून घ्या प्रभाग क्रमांक 1 ते 3 चा निकाल

प्रभाग क्रमांक 1 ते 3 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल

‘टापू’ने सर केला गड ! प्रभाग क्रमांक 7 ते 9 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल

Comments are closed.