वणी तालुक्यातील 101 ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
'या' ग्रामपंचायती 'या' प्रवर्गासाठी राखीव...
जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील 101 ग्राम पंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण आज मंगळवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी जाहीर झाले. यात अनुसुचित जातीसाठी 6, अनुसुचित जमातीसाठी 11, नागरिकांचा मागास वर्ग (ओबीसी+इतर जाती) 27 तर सर्वसाधारण वर्गासाठी 57 ग्रामपंचायती राखीव आहे. यात सर्वसाधारण गटातील महिला आरक्षण हे गुरुवारी 4 फेब्रुवारीला यवतमाळ येथे जाहीर होणार आहे. वणी येथील आरक्षण प्रभारी तहसीलदार विवेक पांडे, नायब तहसीलदार महेश रामगुंडे, अशोक ब्राम्हनवाडे ईत्यादींच्या उपस्थितीत 8 वर्षीय बालक प्रशिल अवताडेच्या हस्ते ड्रॉ द्वारा काढण्यात आले.
अनुसूचित जातीसाठी चारगाव, कोलेरा, तेजापूर, कायर, चिखली, बाबापूर ग्रामपंचायत तर अनुसूचित जमातीसाठी पुरड़ (नेरड), राजुर (कॉ), बेलोरा, निलजई, बोरी, ब्राह्मणी, मुंगोली, नायगाव (बु), गोवारी (कोना), नायगाव (खु), कृष्णाणपूर इत्यादी ग्रामपंचायती सुटल्या आहेत. नागरिकांचा मागास वर्ग (ओबीसी+इतर जाती) इत्यादीसाठी शिरपूर, कळमना (खु), कवडसी, कुरई , घोन्सा, टाकळी, डोर्ली, दहेगाव (घो), नांदेपेरा, निंबाळा (रोड), नेरड (पुरड), पळसोनी , पिंपरी (का), पुनवट, पुरड (पूनवट), पेटूर, भांदेवाडा, भुरकी, मजरा, माथोली, मोनी, मोहदा, वडगाव (टिप), वडजापूर, वरझडी, शिवणी (जहाँ), साखरा (को) या ग्रामपंचायती सुटल्या आहेत.
सर्वसाधारण ग्रा.पं.मध्ये अहेरी, उकणी, उमरी, कळमना (बु), कुंड्रा, कुंभारखनी, कुर्ली, केसुर्ली, कोणा, कोलगाव, खांदला, गणेशपूर, गोवारी (पार्डी), चनाखा, चिंचोली, चिखलगाव, चिलई, झोला, ढाकोरी (बोरी), तरोडा, नवरगाव, निंबाळा (बु), निळापूर, निवली, पठारपूर, परमडोह, परसोडा, पिंपळगाव, बेसा, बोरगाव (मे), बोर्डा, भालर, मंदर, महाकालपूर, मानकी, मारेगाव (को), मेंढोली, मोहुर्ली, येनक, रांगणा, रासा, लाठी, लालगुडा, वांजरी, वागदरा, वारगाव, विरकुंड, वेळाबाई, शिंदोला, शेलु (बु), शेलु (खु), शेवाळा, साखरा (दरा), सावंगी, सावर्ला, सुकनेगाव, सोनेगाव ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
सर्वसाधारण ग्रामपंचायतीमधील महिलांसाठी कोणत्या ग्रामपंचायती राखीव राहणार हे 4 फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा: