बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरात बारावीच्या वर्गात शिकणारी अल्पवयीन विद्यार्थिनी ट्युशनला जाते असे सांगून घराबाहेर पडली; मात्र रात्रीपर्यंत घरी परतलीच नाही. बराच वेळ शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर चिंताग्रस्त पालकांनी वणी पोलीस ठाणे गाठत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलगी ही 16 वर्ष 7 महिन्याची असून ती वणीतील एका शाळेत 12 व्या वर्गात शिकते. तिचे आई वडील दोघेही मजुरी करतात. मंगळवारी दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी पीडित मुलगी ही कॉलेजला गेली. त्याचवेळी तिचे आई वडील देखील कामाला गेले. दुपारी ती कॉलेज करून घरी परत आली. त्यानंतर ती बहिणीला ट्युशला जाते असे सांगून घरून निघाली.
संध्याकाळी तिचे पालक कामावरून परत आले. मात्र त्यांची मुलगी काही घऱी पोहोचली नाहीत. बराच वेळ झाल्याने ती परत न आल्याने वडिलांनी त्यांच्या मुलाला याबाबत माहिती दिली. मुलाने सर्व ठिकाणी शोध घेतला मात्र ती आढळली नाही. अखेर तिच्या पालकांनी वणी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली.
पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात बीएनएसच्या कलम 137 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.


Comments are closed.