जितेंद्र कोठारी, वणी: घरात छुप्या रितीने सुरू असलेल्या 4 गोमांस विक्रेत्यांवर आज सकाळी वणी पोलिसांनी धाड टाकली. रजा नगर येथे 2 घरी 170 किलो गोमांस तर मोमिनपुरा येथे 2 घरी 150 किलो गोमांस आढळून आले. या चारही कारवाईत सुमारे सव्वा 300 किलो गोमांस जप्त करण्यात आले असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. डीबी पथकाने सदर कारवाई केली आहे. सदर मांस सडलेल्या अवस्थेत असल्याने ते नष्ट करण्यात आले.
रविवारी वणीतील काही ठिकाणाहून छुप्या रितीने गोमांस विक्री विक्री होत असल्याची माहिती ठाणेदार वैभव जाधव यांना खबरीकडून मिळाली. त्यानुसार त्यांनी डीबी पथकाला याबाबतची माहिती देत कारवाईचा आदेश दिला. डीबी पथकाने सकाळी 6.15 वाजताच्या सुमारास मोमिनपुरा येथील मो. नासिर अब्दुल रशीद (51), याच्या घरी धा़ड टाकली असता 70 किलो गोमांस आढळून आले ज्याची किंमत 14 हजार रुपये तर तर मो. कैसर अब्दुल अजीज कुरेशी (45) याच्या घरी 80 किलो मांस आढळून आले. ज्याची किंमत 16 हजार इतकी आहे.
ही कारवाई आटपून तातडीने डीबी पथकाने रजा नगर येथे ताफा वळवला. सकाळी 8 वाजताच्या दरम्यान त्यांनी रजा नगर येथील इस्तेयाक अ. वहाब कुरेशी (48) याच्या घरी धाड टाकली असता त्याच्या घरी 90 किलो मांस आढळून आले. ज्याची किंमत 18 हजार रुपये इतकी आहे तर त्याच परिसरातील मो. जुबेर अब्दुल मूनाफ (32) याच्या घरी धाड टाकली असता त्याच्या घरी 80 किलो मांस आढळून आले. ज्याची किंमत 16 हजार इतकी आहे. या संपूर्ण धाडसत्रात पोलिसांनी 320 किलो मांस जप्त केले असून त्याची किंमत 66 हजार रुपये आहे.
जप्त केलेले मांस नष्ट
सदर धाड टाकत असताना डीबी पथकासोबत पशू वैद्यकीय अधिकारी सोबत होते. मांस जप्त केल्यावर त्याच ठिकाणी त्याचा पंचनामा करण्यात आला. यात सदर मांस हे आरोग्यास हानिकारक असल्याने पशु वैधकीय अधिकारी यांचे अभिप्राय दिला. त्यानुसार भालर रोड स्थित नगर परिषद डम्पिंग यार्डमध्ये खड्डा करून जप्त केलेले मांस नष्ट करण्यात आले.
सदर कारवाई ठाणेदार वैभव जाधव यांच्या नेतृत्वात पीएसआय गोपाल जाधव, पोना गजानन होटगीर, दीपक वाडर्सवार, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, पंकज लांजेवार, प्रगती काकडे, संतोष आढाव, सुनील खंडागळे, सुधीर पांडे यांनी केली.
हे देखील वाचा:
एकाच्या शेतातील विहीर दुस-याच्या शेतात आणण्यासाठी वादग्रस्त मोजणी