आधी ‘मी’च… गर्भवती होताच ‘तो मी नव्हेच’ !

विधवेला गर्भवती करून तरुणाचे हात वर, गुन्हा दाखल

0

जितेंद्र कोठारी, वणी: लग्नाचे आमिष दाखवून एका विधवेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी तीन वर्षांपासून महिलेचे शोषण करीत होता. दरम्यान गर्भवती होताच तरुणाने हात वर केले. अखेर विधवा महिलेच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण किशोर खेडेकर (28) असे आरोपीचे नाव आहे. 

आरोपी लक्ष्मण हा शहरातील सर्वोदय चौकात राहतो. त्याच जवळच्याच परिसरात पीडित विधवा महिला (38) राहते. आरोपीला पीडिता विधवा असल्याची माहिती होती. त्यामुळे आरोपीने पीडितेच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचे ठरविले व तिला आपल्या प्रेमपाषात अडकवण्यासाठी विविध अस्त्र फेकले.

काही दिवसांतच पीडिता यात अडकली. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले व तिच्याशी संबंध ठेवायला सुरूवात केली. 2018 पासून हा प्रकार सुरू आहे. दरम्यान पीडिता महिला गर्भवती राहिली. तिने आरोपीला लग्नाबाबत विचारणा केली. मात्र आता आरोपीने ‘तो मी नव्हेच’ ही भूमिका घेतली. अखेर पीडित महिलेने बुधवारी पोलीस स्टेशन गाठले व याबाबत तक्रार दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांनी आरोपी लक्ष्मण किशोर खेडेकर (28)  वर भादंविच्या कलम 376, 417 नुसार गुन्हा नोंद केला आहे. ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात सपोनि माया चाटसे पुढील तपास सुरू आहे.

हे देखील वाचा:

मुलाचे हैवानी कृत्य… ब्राह्मणी परिसरात जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार

आता अवघ्या 1.5 हजारात कुंपन झटका मशिन

Leave A Reply

Your email address will not be published.