पाईपलाईन टाकूनही दोन वर्षांपासून नळ कनेक्शन नाही
रंगनाथ नगर येथील रहिवाशांचे पाण्याअभावी हाल
जब्बार चीनी, वणी: रंगनाथ नगर येथे गेल्या दोन वर्षांपासून पाण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र त्यावर अद्याप नळ कनेक्शन न जोडल्याने तेथील रहिवाशांना पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या तेथील नागरिकांनी आज मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर नळ कनेक्शन जोडण्याची मागणी केली. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले.
वार्ड क्र. 17 रंगनाथ नगर येथे दोन वर्षांआधी जुनी पाईपलाईन काढून तिथे नवीन पीवीसी पाईपलाईन बसवण्यात आली. मात्र नवीन पाईपलाईनवरून अद्यापही नळ कनेक्शन देण्यात आलेले नाही. जुन्या पाईपलाईनवरून पुरेसे पाणी येत नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पाण्याअभावी तेथील रहिवाशांना रहिवाशांचे हाल होत असून त्यांना इतर ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
या समस्येबाबत आज सोमवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल ढुरके यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. जर लवकरात लवकर पाण्याची समस्या सोडवली नाही तर मोठे आंदोलन पुकारू असा इशाराही त्यांनी दिला आहे. निवेदनावर निखिल ढुरके, मनोज दुपारे, अमोल दुर्गे, माया ओंढरे, भानु बोरकुटे, विद्याधर पाटील, रितेश बोरपे, सुमन दुर्गे, वेदांती दुर्गे, गजानन ठोंबरे यांच्या सह्या आहेत.
हे देखील वाचा: