जागृत पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर

तालुका अध्यक्षपदी संदिप बेसरकर तर सचिवपदी मोहम्मद मुष्ताक

0

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी जागृत पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी न्यूज आपली वणीचे संदीप बेसरकर तर सिटीन्यूजचे मोहम्मद मुष्ताक यांची सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. याशिवाय उपाध्यक्षपदी विवेक तोटेवार व सहसचिवपदी पुरुषोत्तम नवघरे यांची निवड करण्यात आली. जागृत पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष राजू धावंजेवार यांच्या अध्यक्षतेत नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली.

आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिनी दिनांक 20 फेब्रुवारीला वणीतील शासकीय विश्राम गृह येथे जागृत पत्रकार संघाच्या कार्यकारिणीबाबत बैठक घेण्यात आली. यात नवीन कार्यकारिणीबाबत चर्चा झाली. या बैठकीचे अध्यक्ष जागृत पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष राजू धांवजेवार होते. यात सर्वानुमते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

अशी आहे कार्यकारिणी…
अध्यक्ष संदीप बेसरकर (न्यूज आपली वणी, दै.महासागर), सचिव मोहम्मद मुस्ताक (सिटी न्यूज) उपाध्यक्ष विवेक तोटेवार (दै.नवराष्ट्र, वणी बहुगुणी), सहसचिव पुरुषोत्तम नवघरे (दै.मातृभूमी) सदस्य मुन्ना बोथरा (लोकवाणी न्यूज पोर्टल), श्रीकांत किटकुले (दै.लोकदूत) गणेश रांगणकर (लोकमत) आकाश दुबे (न्यूज आपली वणी) रफिक शेख (फोटो जर्नालिस्ट) प्रवीण नैताम (सकाळ) मनोज नवले (आपला हक्क) प्रशांत चंदनखेडे (सायरन, वणी सिटी), राहुल अहुजा (विदर्भ चंडिका) यांचा समावेश आहे. तर कायदेशीर सल्लागार म्हणून ऍड. अमोल टोंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे देखील वाचा:

पाईपलाईन टाकूनही दोन वर्षांपासून नळ कनेक्शन नाही

सोशल मीडियावरील लॉकडाऊनच्या विविध आदेशामुळे संभ्रमाचे वातावरण

Leave A Reply

Your email address will not be published.