वेकोलीमध्ये वाढतेय डिझेल चोरी

डिझेल चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील जुनाड खदान येथील वर्कशॉपमधून डिझेल चोरी करणाऱ्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना बुधवार 17 नोव्हेंबर पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली. जुनाड येथील सुरक्षा प्रहारी यांच्या तक्रारीवरून सदर गुन्हा दाखल केला आहे.

जुनाड खदान येथील वर्कशॉपमधून सुभाष विलास डांगे (30) पंचशील नगर भद्रावती, ईश्वर भगवान जमदाडे (35) तेलवासा तालुका भद्रावती व विकास विलास डांगे (42) पंचशीलनगर भद्रावती हे डिझेल चोरी करीत होते. त्याच वेळी येथे सुरक्षा प्रभारी म्हणून कार्यरत असणारे इंद्रजीत जयराम यादव व इतर सहकारी यांच्या मदतीने या तिन्ही आरोपींना पकडले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांच्याकडे 50 लिटर डिझेल किंमत 4600 रुपये होते. इंद्रजीत यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात तिन्ही आरोपींविरुद्ध कलम 379, 34 भादंविनुसार गुन्हा नोंद केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश गोरलेवार करीत आहे.

Comments are closed.