जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदीसह विकेंड लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी आज 10 एप्रिल रोजी वणीची संपूर्ण बाजारपेठ स्व:स्फूर्त बंद ठेवण्यात आली. दुग्धजन्य पदार्थांची दुकाने वगळता शहरात इतर सर्व व्यावसायिक प्रतिष्ठान बंद आहे.
वणी बस स्थानकावरून एस.टी. बस फेऱ्याबथोड्या फार प्रमाणात सुरू आहे. मात्र प्रवासी नसल्यामुळे बहुतांश फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. चंद्रपूर ते उमरखेड जाणारी बस आज सकाळी वणी पर्यंत आली. परन्तु पुढील प्रवासी नसल्यामुळे बस वणीहून परत गेल्याची माहिती आहे.
विकेंड लॉकडाउन बाबत व्यापारीवर्ग द्विधा मनस्थितीत होते. परन्तु आज सकाळी पासून पोलीस, पालिका व महसूल पथकाने शहरात गस्त घालून दुकाने बंद ठेवण्याचा आवाहन केले. त्यामुळे इतर सर्व दुकानांसह किराणा, फळभाजी, बांधकाम साहित्य, कृषी केंद्र दुकानेही बंद आहे.
शहरातील गांधीचौक, खाती चौक, जटाशंकर चौक, टिळक चौक, वरोरा रोड, यवतमाळ रोडवरील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठान शंभर टक्के बंद आहे. फक्त पेट्रोल पंप व पथसंस्था सुरु आहे.
हे देखील वाचा: