देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या जवानाचे जंगी स्वागत

हनुमान नगर वासियांनी व्यक्त केली कृतज्ञता

तालुका प्रतिनिधी, वणी: देशाच्या रक्षणासाठी सीमेवर यशस्वीपणे सेवा देऊन स्वगृही परतणाऱ्या निवृत्त जवानाचे शिंदोला लगतच्या हनुमाननगर वाशीयांनी बुधवारला उत्स्फूर्तपणे स्वागत केले. संतोष महादेव बानकर असे सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचे नाव आहे. बळीराजा एकता बचतगटाच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

वणी तालुक्यातील हनुमाननगर (शिंदोला) येथील संतोष बानकर हे वीस वर्षांपूर्वी सीमा सुरक्षा दलातील पश्चिम रेजिमेंटमध्ये भरती झाले. त्यांनी देशातील वेगवेगळ्या ठिकाणी सेवा दिली. जवळपास 20 वर्ष 6 महिने सेवाकाळ पूर्ण करून 30 सप्टेंबर 2021 ला एच.सी.रँक पदावरून सेवा निवृत्त झाले.

त्यांच्या स्वागतासाठी दि. 6 ऑक्टोबरला गावात जय्यत तयारी करण्यात आली. रस्ते रांगोळी काढून सजवले. ठिकठिकाणी स्वागत कमान उभारल्या. फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतिषबाजी करीत आणि ‘भारत माता की जय’ ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देत गावातून सन्मान रॅली काढण्यात आली. महिलांनी औक्षवंत केले.

मित्र, ग्रामस्थांनी हार, फुलांनी स्वागत केले. जवान संतोष यांचा शाल,श्रीफळ आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन आई-वडील, पत्नी, मुलांसोबत सत्कार करण्यात आला. संतोष यांनी सत्काराला उत्तर देताना सेवा काळातील कामगिरीसह वेगवगळे किस्से सांगितले.

सत्कार समारंभाच्या मंचावर वणी पंचायत समितीचे सदस्य संजय निखाडे, सरपंच कल्पना टोंगे, उपसरपंच अनिल गारघाटे ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया पंडिले, सुषमा ढवळे, ज्योती उईके, दत्ता बोबडे, राजू गोरे आदी उपस्थित होते. संचालन प्रवीण मेश्राम यांनी केले. रवींद्र पांगुळ यांनी आभार मानले. कार्यक्रमाला बळीराजा एकता गटाचे सदस्य आणि ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले.

हे देखील वाचा:

लैंगिक अत्याचाराला त्रासामुळे शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवरात्री स्पेशल ‘बिग धमाका’ ऑफर लॉन्च

Comments are closed.