सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन येथील बालाजी जिनिंगला आग लागून सीसीआयने खरेदी केलेला केलेला 1600 क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली. मात्र याबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात आहे. जिनिंग मधील खासगी खरेदी केलेल्या कापसाचा एकही बोन्ड जळाला नसताना सीसीआयच्या खरेदी केलेल्या कापसाला आग लागल्याने संशय व्यक्त केल्या आहे. त्यामुळे ग्रेडर आणि जिनिंग मालकाची चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.
शेतकऱ्यांनाच्या चांगला कापूस सीसीआय मार्फत खरेदी करून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम शासनाने केला होता. परंतु यालाही छेद पाडण्याचे काम खाजगी खरेदी करणारा व्यापारी, दलाल, ग्रेडर यांच्या संगनमताने शेतकऱ्यांना मारण्याचे काम करण्यात आले. शेतकऱ्यांनाचा चांगला कापूस रद्द करून खाजगी जिनिग मध्ये विकण्यास मजबूर केले तर दलाल व व्यापाराचा कवडी कापूस 5 हजार 300 रुपयाने खरेदी करण्यात आला.
खासगी जिनिंगमधील खरेदी केलेला कापूस सुद्धा सीसीआयच्या खरेदीत मिळवून मोठा घोळ करण्यात आला. ज्यामुळे व्यापाराचा खराब (कवडी) कापूस 200 क्विंटलच्या जवळपास जाळून 1600 क्विंटल जळल्याची खोटी तक्रार देण्यात आल्याचा आरोप होत आहे. याशिवाय व्यापाराचा खरेदी केलेला खराब कापसातील घोळ लपविण्याकरिता तर जिनिंगला आग लावण्यात आली नाही असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव न देता ग्रेडर यांनी नेमणूक केलेले असिस्टंट दोन तरुणांनी शेकऱ्यांचा कापूस खराब म्हणून रद्द केले तर हेच कापूस खाजगी जिनिग मध्ये घेऊन सीसीआयच्या माथी मारण्यात आले. शेतकऱ्यांचा छळ करणाऱ्या ग्रेडर, जिनिग मालक, दलाल व्यापारी यांच्या विरुद्ध कार्यवाही करिता विविध पक्षातील लोकप्रतिनिधी, सत्ताधारी विरोधी पक्षनेते, लीडर, गावपुढारी अजूनही का पुढाकार घेत नाही असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांनाच्या नावावर विविध निवेदन देणे मोठं मोठे आस्वासन देणे असा प्रचार चालतो मग आज शेतकऱ्यांना मारून स्वतःचे पोट भरणारे तसेच शासनाला कोट्यवधींचा चुना लावण्याचा पर्यंत करणार्याविरुद्ध एकाही पक्षाचा माणूस पुढं येत नसल्याने राजकीय लोकांबद्दल शेतकऱ्यांचा विश्वस उठत चालला आहे. तरी बालाजी जिनिंग मधील जळालेल्या कापसाची चौकशी होऊन ग्रेडर, असिस्टंट ग्रेडर, जिनिग मालक याच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्याकरिता राजकीय लोकांनी पुढाकार घेणे शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण करावा अशी मागणी होत आहे.