पाण्यासाठी महिलांची नगरपंचायतीवर धडक

पाणी देण्यास नगरपंचायतीला अपयश

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतवर प्रभाग क्रमांक ११ मधील शेकडो महिलांनी शनिवारी नगर पंचायतीला धडक दिली. प्रभागातील बोरवेल गेल्या दोन महिन्या पासून बंद असल्याने तिथे पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी सकाळी साडे अकराच्या सुमारात नगर पंचायत कार्यालयात धडक दिली. मात्र तेव्हा कार्यालयात कुणीही जबाबदार कर्मचारी वा नगरसेवक नसल्याने महिला काही काळ आक्रमक झाल्या होत्या.

प्रभाग क्रमांक 11 मध्ये गेल्या 10-12 वर्षांपासून बोअरवेल सुरू होती. ग्रामपंचायत प्रशासनाने त्या बोअरवेलवर सबमर्सीबल मोटर लाऊन पाण्याची टॅंक बसविली, परंतु या वर्षी पाऊस अत्यल्प पडल्याने पाण्याची पातळी खोल गेली. गेल्या महिन्यात नगरपंचायत प्रशासनाने त्या बोअरवेलला मशीनने साफ केले. परंतु त्या मध्ये केसिंग न टाकल्याने ती बोअरवेल पुन्हा बुजली. त्यामुळे सध्या प्रभागातील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

नगरपंचायतने जर बोरवेल साफ करताना केसिंग टाकले असते तर कदाचित बोअरवेल सुरू राहिली असती असे प्रभागातिल महिलाचे म्हणने आहे. सुविधा पुरविण्यासाठी नगरपंचायतने मारेगाव वासियाकडुन कोर्टाची नोटिस देऊन पाणी कर वसूल केला. पर्ंतु पाणी देताना नगरपंचायत थातुरमातुर कामे चालू असल्याचे कारण देत आहे असा आरोप उपस्थित महिलांनी केला आहे. प्रभागात तात्काळ पाण्याची व्यवस्था करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.