रायजिंग डे निमित्ताने क्रीडा स्पर्धेचे आयोजन

वणी पोलिसांतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन

0

वणी (रवी ढुमणे): महाराष्ट्र पोलीस रायजिंग डे च्या निमित्ताने वणी पोलिसांनी क्रीडा सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्याचे उदघाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, ठाणेदार बाळासाहेब खाडे आदींनी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या क्रीडा सामन्यात कबड्डी,व्हॉलीबॉल, सामने खेळविल्या गेले. यात प्रशासनातील अधिकारी कर्मचारी, पोलीस पाटील, युवक संघ, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आदी चमुनी सहभाग नोंदवला.

पहिल्यांदाच रायजिंग डे च्या निमित्ताने वणी पोलिसांनी क्रीडा सामने घेतले. या सामन्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पन्नाशीच्या आसपास असलेल्या चमुनी या सामन्यात चुणूक दाखविली.

Leave A Reply

Your email address will not be published.