अपघात: रसोया प्रोटिन्समध्ये 50 फुट उंचीवरून पडले कामगार

रंगरंरोटी करताना अपघात, दोन्ही जखमींवर नागपूर येथे उपचार सुरू

जितेंद्र कोठारी, वणी: येथील नांदेपेरा मार्गावर स्थित गोयनका प्रोटिन्स प्रा. लि. (पूर्वीची रसोया प्रोटिन्स) मध्ये 50 फूट उंचीवरून पडून 2 कामगार गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. अनिल ताजने आणि विनोद तिखट दोघेही रा. वांजरी असे जखमी कामगारांचे नाव आहे. त्यांच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. विशेष म्हणजे एवढा मोठा अपघात होऊनही या अपघाताबाबत कारखाना प्रबंधक किंवा प्रथमोपचार करणाऱ्या चिकित्सकांकडून स्थानिक पोलीस स्टेशनला साधी सूचनाही देण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार नांदेपेरा मार्गावरील रसोया प्रोटिन्स कारखाना नागपूर येथील गोयनका प्रोटिन्स प्रा. लि. यांनी खरेदी केला आहे. या कारखान्यात गेल्या अनेक महिन्यापासून डागडुजी व रंगरंगोटीचे काम सुरु आहे. गुरुवार 2 सप्टें. रोजी फॅक्टरीमध्ये पूजा होती. सकाळी 10 वाजताच्या सुमारास वांजरी येथील अनिल ताजने व विनोद तिखट नावाचे कामगार कारखान्याच्या छतावरील सिमेंट टिनपत्र्यावर बिरला व्हाईटची रंगरंगोटी करण्यासाठी चढले होते.

रंगरंगोटी करताना ज्या सिमेंट टिनपत्र्यावर अनिल व विनोद उभे होते ते टिनपत्रे अचानक तुटले. त्यामुळे दोघेही कामगार 50 फूट खाली जमिनीवर कोसळले. पूजा सुरू असतानाच ही घटना घडली. दरम्यान उपस्थित कामगारांनी दोघांना तात्काळ शहरातील एक अस्थीरोग दवाखान्यात आणले. विनोद तिखट यांना अनेक ठिकाणी फ्रॅक्चर आहे. तर अनिल ताजने यांना गंभीर दुखापत झाली आहे. यांच्या कंबर, पाय, हनुवटी इत्यादी या ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. दोघांनाही नागपूर येथील गेटवेल दवाखान्यात दाखल करण्यात आले.

कामगारांची सुरक्षा वा-यावर?
उंचीवर काम करताना सेफ्टी बेल्ट, हेल्मेट इत्यादी सुरक्षा उपकरणे वापरणे गरजेचे असते. मात्र कारखाना प्रबंधकांनी दोन्ही कामगारांना कोणतीही सुरक्षा बेल्ट व हेल्मेट न देता 50 फूट उंचीवर रंगरोटी करण्यासाठी चढविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. माहितीनुसार यापूर्वीही गोयनका प्रोटिन्स मध्ये काही अपघात घडले होते, परंतु ते परस्पर मिटविण्यात आल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा:

भामट्याने वृद्ध महिलेला गंडवले, दागिने घेऊन पसार

धक्कादायक: वणीतील बहुतांश दवाखान्यात आग प्रतिबंधक यंत्रणाच नाही

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.