नागेश रायपुरे, मारेगाव: बिरसा ब्रिगेडने शहरात शेकडो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत रविवारी जागतिक आदिवासी दिन साजरा केला. शहरातील बिरसा मुंडा चौक येथे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हार अर्पण केले. यावेळी सर्व आदिवासी बांधवांनी विविध नाऱ्यांचा जल्लोष केला. संघटनेच्या अनेक मान्यवरांनी विचारदेखील मांडलेत.
बिरसा मुंडा चौकातून सर्व पदाधिकारी आंबेडकर चौकात गेलेत. तिथे संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण झाले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला आदिवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बिरसा ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शेषराज मडावी, सेवा निवृत्त तहसीलदार शंकररावजी मडावी, टी. एल. पेंदोर, होमदेवजी कन्नाके, श्रीधर सिडाम, बीरसा ब्रिगेडचे तालुका सचिव कैलास मेश्राम, आनंदराव मसराम, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी जुमनाके, पैकुजी आत्राम, वासुदेव टेकाम, तुळशीराम मंडळी, देवगडकर, सोयाम, पुंडलिक गेडाम, संतोष जुमनाके, लक्ष्मण पेंदोर, विजय टेकाम, राहुल कन्नाके, सचिन मेश्राम, संतोष कन्नाके, संदीप सोयाम, राजेश मुरझडी, अविनाश पेंदोर, रंगदेव कन्नाके, निखिल गेडाम, आदिवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.