यवतमाळ जिल्हा बँकेच्या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे खासदार गप्प का ?
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा सवाल
जितेंद्र कोठारी, वणी: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गैरव्यवहाराची सीबीआय चौकशीची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांनी केलेल्या गैरव्यवहारावर खासदार गप्प का ? असा सवाल वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उपस्थित केला आहे.
चंद्रपुर जिल्हा बँकेप्रमाणे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकवरही काँग्रेसची सत्ता आहे. बँक निवडणुकीत खासदार धानोरकर यांनी आपले वजन वापरून अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची नियुक्ती केली. जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्याच्या भागभांडवलवर उभी असलेल्या जिल्हा बँकेच्या एका संचालकांनी बँकेच्या पाटण शाखेच्या प्रबंधकासोबत संगनमत करून 18 लाख रुपयांचे बनावट एफडीआर तयार करुन बँकेची फसवणूक केली आहे. परंतु यवतमाळ जि. म. स. बँकेच्या संचालकावर कारवाईबाबत खासदारांनी अद्यापही मौन धरण केल्याचा आरोप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणी बहुगुणीशी बोलताना केला.
कनिष्ठ लिपिकाला बँक प्रबंधकचा प्रभार
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाटण शाखेत कनिष्ठ लिपिक असलेल्या व्यक्तीला बँक मॅनेजरचा प्रभार देण्यात आला. वास्तविक पाहता त्या शाखेतील कार्यरत वरिष्ठ महिला लिपिकाला डावलून संचालकांच्या जवळच्या कनिष्ठ लिपिकाला बँक मॅनेजरचा पदभार स्वहितासाठी देण्यात आला.
संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार- वणी विधानसभा
Comments are closed.