पाटण पोलीस स्टेशनमध्ये योगदिन साजरा

0

सुशील ओझा, झरी: होमगार्ड व गुडमॉर्निग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण पोलीस ठाण्यात जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात होमगार्ड, पोलीस कर्मचारी व सर्वसामान्यही सहभागी झाले होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मोहम्मद इरफान युसूफ व अविनाश जयस्वाल यांनी प्रशिक्षण दिले. ठाणेदार शिवाजी लष्करे, गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांनी विचार व्यक्त केले. आजच्या तणावयुक्त व धावपळीच्या युगात मानवाला अनेक दुर्धर आजारांनी ग्रासले आहे. योगा केल्याने अनेक आजारांना आपल्या शरीरापासून दूर ठेऊ शकतो. त्यामुळे वेळेत वेळ काढून योगा करून निरोगी तंदुरुस्त रहा, असे मार्गदर्शन केले.

यावेळी सरपंच रमेश हलालवार, राम अईटवार, शेख अजगर, अमोल अन्नेरवार, राहुल राठोर, सुभाष, अंकुश पाथोडे, शंकर, मोहम्मद इरफान मोहम्मद युसूफ, नरेश कायपेलिवार, गंगाधर गेडाम, शेख शब्बिर उपस्थित होते..

Leave A Reply

Your email address will not be published.