तरुणाने घेतली पाटाळ्याच्या पुलावरून उडी

सीसीटीव्ही चेक केल्यानंतर घटना उघडकीस

विवेक तोटेवार, वणी: पाटाळ्याच्या पुलावरून एका तरुणाने उडी घेतली. आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून उघडकीस आली. उडी घेणा-या तरुणाचे नाव प्रणय संजय गोखरे (22) असे असून तो जैन ले आऊट येथील रहिवासी आहे. तो शिक्षण घेत आहे. सकाळी 9 वाजताच्या सुमारास तो रागाच्या भरात घरून निघून गेला. त्याच्या कुटुंबीयांनी ही माहिती त्याच्या मित्रांना दिली. त्यामुळे त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार व शेजारी त्याचा शोध घेत होते. दरम्यान त्याचे मित्र पाटाळ्याच्या पुलाकडे गेले असता त्यांना तिथे प्रणयची दुचाकी उभी दिसली. संशय आल्याने त्यांनी महामार्गावरील सीसीटीव्ही चेक केले असता 10 वाजून 1 मिनिटांनी प्रणय पुलावरून उडी घेताना दिसला. सदर माहिती तातडीने वणी पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार गोपाळ उंबरकर यांनी सहका-यांसह तातडीने घटनास्थळ गाठले. सध्या बचाव पथकाला याची माहिती देण्यात आली आहे. प्रणय हा एमबीए करीत असल्याची माहिती आहे. (अखेर तिस-या दिवशी तरुणाचा मृतदेह आढळला.)

नदीत उडी घेणा-या तरुणाचा अखेर मृतदेह आढळळा

Comments are closed.