कुमारिकेला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी तरुणाला अटक

मैत्रिणीच्या वाढदिवसाला जातो सांगून अल्पवयीन मुलगी झाली होती बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवल्या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या महिन्यात सदर मुलगी ही मैत्रिणीच्या वाढदिवसाला जातो असे सांगून घरून निघून गेली होती. मात्र त्यानंतर अनेक दिवस ती घरून बेपत्ता होती. मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Podar School 2025

कुमारिका ही शहरातील एका ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेते. ती दिवसभर कॉलेज व शिकवणी वर्ग झाल्यावर सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास ती आपल्या दुचाकीने घरी परत यायची. मात्र 11 मार्च रोजी तिने घरी शिकवणी वर्ग झाल्यावर तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाणार असल्याचे सांगून रात्री 7.30 वाजेपर्यंत घरी येणार असल्याची घरी कळवले. मात्र रात्री उशिर झाल्यानंतरही ती घरी परतली नाही. पालकांनी फोन करून बघितला असता तिचा फोन स्विच्ड ऑफ येत होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घाबरलेल्या पालकांनी तिच्या मैत्रिणीला फोन करून विचारणा केली असता ती शिकवणी वर्गाला आलीच नसल्याचे त्यांना समजले. त्यानंतर पालकांनी नातेवाईकांना फोन करून विचारणा केली. परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही. शेवटी 12 मार्च रोजी पालकांनी वणी पोलीस स्टेशन गाठून त्याबाबत तक्रार दिली होती. तेव्हापासून पोलीस प्रकरणाचा तपास करीत होते.

चौकशीत पोलिसांना कळले की कुमारिकेच्या घराजवळच बोरगाव (मेंढोली) येथील तुषार दिगांबर देवाळकर (20) हा तरुण राहायचा. तो शहरातील एका पेट्रोलपम्पावर काम करायचा. तिच्यासोबत या तरुणाची मैत्री होती. सदर कुमारिका बेपत्ता असल्यापासून हा तरुणही बेपत्ता होता. त्यामुळे पोलिसांनी  हा धाग पकडून चौकशी केली असता प्रेम प्रकरणातून तुषारने फूस लावून कुमारिकेला पळवून नेल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

दरम्यान कुमारीका ही घरी परत आली. तिला विचारपूस केली असता आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची माहिती मिळाली. तर दुसरीकडे तरुण देखील घरी परतला होता. सोमवारी पोलिसांनी आरोपीला घरी जाऊन पकडले.

पोलिसांनी आरोपी तुषार देवाळकर विरोधात भादंविच्या कलम 363, 366 (अ), 376 (2) (J) (N) व पोक्सोच्या कलम 4 व 6 अंतर्गत गुन्हा दाखल केला. आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकरणाचा तपास ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मागदर्शनात सपोनि प्रवीण हिरे व शिपाई पुरुषोत्तम दडमल करीत आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.