बहुगुणी डेस्क, वणी: सिंधी कॉलोनी येथील रहिवासी असलेल्या एका 30 वर्षीय तरुणाने बिल्डींगवरून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी दिनांक 5 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हितेश जगदीश फेरवानी (30) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने घराच्या तिस-या माळ्यावरून उडी घेतली होती. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला नागपूर येथे रेफर केले होते. गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. हितेशच्या पार्थिवावर संध्याकाळी वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मानसिक स्वास्थ ठिक नसल्याने हितेशने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.

Comments are closed.