कायर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

एकुलता मुलाच्या आत्महत्येने आई वडिलांवर कोसळलं दुःखाचा डोंगर

 

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील कायर गावात एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार सकाळी 6 वाजता उघडकीस आली. शंकर तुकाराम मंगाम रा. पठारपुर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचाचा नाव आहे. कायर सिंदीवाढोणा मार्गावर जयस्वाल यांच्या ले आऊट मधील लिंबाच्या झाडाला नारळच्या दोरीच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतल्याचे आढळले. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्राप्त माहितीनुसार मृतक हा पठारपुर गावातील रहिवासी असून आईवडिलांना एकुलता होता. तो रोजमजुरी काम करीत होता. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी पोहचले. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम साठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. युवकाची आत्महत्या मागे नेमके कारण अद्याप स्पष्ट आहे. मृत युवकाचे मागे आई वडील आणि दोन विवाहित बहिणी आहे. 

Comments are closed.