जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी बोरी गावातील तरुणांनी शिवसेना प्रणीत युवासेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर व युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
बोरी गावातील चेतन ठाकरे, निखिल देवाळकर, सुरेंद्र वासेकर, शुभम ठाकरे, पंकज ठाकरे, जयंत गताडे, मंगेश वासेकर, भास्कर मडावी यांच्यासह अनेक तरुणांनी युवा सेनेत प्रवेश केला. विश्वास नांदेकर व युवासेना विस्ताकर दिलीप घुगे यांच्या मार्ददर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला.
विश्वास नांदेकर यांनी शिवबंधन बांधणा-या तरुणांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना आणि युवासेना यांच्या कार्याने प्रेरीत होऊन प्रवेश करीत असल्याची प्रतिक्रिया तरुणांनी दिली. यावेळी वणी तालुका समन्वयक अनुप चटप व रुपेश डा़हुले यांचीही उपस्थिती होती.
खेडोपाडी युवासेना वाढविण्यासाठी अभियान: विक्रांत चचडा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यातून प्रेरित होऊन अनेक तरुण सध्या युवासेनेकडे आकर्षीत होत आहे. कोणत्याही समस्यांना धावून येणारा तरुण हा युवासेनेचाच असतो हे तरुणाईला माहिती आहे. त्यामुळे अनेक तरुण युवासेनेत येण्यास इच्छुक आहेत. खेड्यापाड्यात युवासेना वाढावी यासाठी येत्या काही दिवसात अभियान राबवले जाणार आहे.
– विक्रांत चचडा, युवासेना जिल्हाप्रमुख
हे देखील वाचा: