काँग्रेस कमेटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रमण डोये

पाच स्थानिक पदाधिका-यांना जिल्हा सचिवपदी बढती

0

नागेश रायपुरे, मारेगाव: काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश घेतलेले शहरातील सुपरिचित युवा नेते रमण डोये यांची जिल्हा कॉंग्रेस कमेटीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. कॉंग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष वजाहत मिर्झा यांच्या आदेशावरून व वणी विधानसभेचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या सूचनेवरून ही निवड करण्यात आली आहे.

आगामी नगरपंचायत निवडणूक लक्षात घेऊन काँग्रेसने मारेगाव येथील अधिकाधिक नेत्यांचा जिल्हा कमेटीमध्ये स्थान दिले आहे. यात रमण डोये यांच्यासह अरूण नक्षिने, शशिकांत आंबटकर, दुष्यंत जयस्वाल, तुळशीराम कुमरे व गजानन खापणे यांची जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवणार: रमण डोये
पक्षाने मोठी जबाबदारी देऊन माझ्यावर विश्वास दाखविला आहे. येत्या काळात पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखविण्यासाठी प्रयत्नशील राहणार. आगामी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेणार याशिवाय पक्षवाढीसाठी विविध कार्यक्रमांचे लवकरच आयोजन केले जाईल.
– रमण डोये, जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या निवडीचे श्रेय जिल्हाध्यक्ष वजाहत मिर्झा, माजी आमदार वामनराव कासावार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील ठाकरे, माजी महिला व बालकल्याण सभापती अरूणा खंडाळकर व काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष मारोती गौरकार यांना देतात.

हे देखील वाचा:

बोरी गावातील तरुणांचा युवासेनेत प्रवेश

कॉलेजला जातो म्हणून घरून निघाली, आणि घरीच नाही परतली

Leave A Reply

Your email address will not be published.