जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. बुधवारी दिनांक 6 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रमेश किसन पावनकर (27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. रमेश हा बुधवारी दुपारी कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास मार्डी – मच्छिन्द्रा जवळील जंगलातील वाघोबा मंदिराजवळून काही शिक्षक जात असताना त्यांना तो रस्त्याच्या कडेला पडून असल्याचे निदर्शनास आले. रमेशने विषारी द्रव्य प्राषन केल्याचे लक्षात येताच शिक्षकांनी त्याला तात्काळ मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांची प्रकुर्ती चिंताजनक असल्याने येथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी वणी येथे रेफर केले. पण वणी येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे आई,वडील, दोन मोठे भाऊ व एक विवाहीत बहीण असा आप्त परिवार आहे. रमेशने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post
Comments are closed.