शाळा क्रमांक 1 ला ग्रीन बोर्ड भेट

क्रांती युवा संघटनेचा उपक्रम

0

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सर्वात जुनी शाळा म्हणून ओळख असलेल्या नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 येते क्रांती युवा संघटनेच्या वतीने ग्रीन बोर्ड (फऴा) देण्यात आला. बुधवारी दुपारी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने हा बोर्ड देण्यात आला. शाळेचे मु्ख्याध्यापक आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी शाळेतील विद्यार्थी आणि संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. वणी तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या तरुणांनी एकत्र येऊन क्रांती युवा ही संघटना स्थापन केली आहे. विविध सामाजिक कार्यात या संघटनेचा सहभाग असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.