…आणि वाढत्या महागाईमुळे केले चक्क मोदी सरकारचे अभिनंदन

वणीत सततच्या भाववाढी विरोधात युवासेनेचे अनोखे आंदोलन

जितेंद्र कोठारी, वणी: दिवसेंदिवस वाढणारी महागाई, पेट्रोल, डिझेलचे रोज वाढणारे दर इत्यादी विरोधात आज वणीत शिवसेना प्रणीत युवासेनेतर्फे थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले. सकाळी 11 वाजता शिवतीर्थासमोर या उपाहासात्मक आंदोलनाला सुरुवात झाली. सततच्या महागाईमुळे थाळी वाजवून युवासैनिक व शिवसैनिकांनी मोदी सरकारचे अ्भिनंदन केले. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे दर वाढतच आहे. वाहतूक खर्च वाढल्याने त्याचा फटका इतर वस्तूंच्या किमतीवर पडला आहे. तसेच केंद्र सरकारने नुकतेच एलपीजी गॅसचा दरही 250 रुपये वाढवला आहे. सतत वाढणारी महागाई रोखण्यात सरकारला अपय़श आल्याने या विरोधात रविवारी दिनांक 3 एप्रिल रोजी थाळी बजाओ हे उपासाहात्मक आदोलन पुकारण्यात आले होते. 

सदर आंदोलन हे वरिष्ठांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात व युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शिवसेना शहप्रमुख राजु तुराणकर, महेश चौधरी, मोंटू वाधवानी, बंटी येरणे, कुणाल लोणारे, प्रफुल्ल बोरडे, स्वप्नील ताजने, नीलेश करटबुजे, शुभम बोबडे,

सचिन मांडवकर, केतन चिकटे, अमृत फुलझले, अनुप चटप, अभिजित सुरसे, राजू लोणारे, साहिल लांजेवार, सूरज मडावी, राजू गोलाईत, अभी गोलाईत, चेतन शेंडे, निखिल सोनटक्के, सचिन पाटील, हरीश शेंडे, हनुमान पायघन, विठ्ठल पाचभाई उमेश भोंगळे, प्रवीण वारारकर यांच्यासह युवासैनिक व शिवसैनिक उपस्थित होते.

हे देखील वाचा:

वणीत उत्साहात गुढीपाडवा साजरा, विविध कार्यक्रमांचे आयोजन

रमजान महिन्यात लोड शेडिंग करू नका

Comments are closed.