रमजान महिन्यात लोड शेडिंग करू नका

महिला शहर काँग्रेस कार्यकारीणीचे निवेदन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रमजान हा मु्स्लिम धर्मीयांचा सर्वात मोठा सण आहे. या महिन्यात छोट्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अधिकाधिक व्यक्ती उपवास (रोजे) करतात. रोजा काळात पाण्याचा एक थेंबही पिला जात नाही. सदर महिना हा उन्हाळ्याचा आहे. लोडशेडिंगमुळे फॅन व कुलर बंद राहतात. त्यामुळे रोजे ठेवणा-या लहान मुलांना व वृद्धांना याचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे संपूर्ण रमजान महिन्यात लोड शेडिंग न करता 24 तास विद्युत पुरवठा ठेवावा अशी मागणी महिला शहर काँग्रेस कार्यकारिणीने निवेदनातून विद्युत वितरण कंपनीकडे केली आहे. यावेळी ज्योती सूर, संध्या बोबडे, काजल शेख, वंदना धगडी, वंदना आवारी, शशी वैद्य, प्रमिला चौधरी, सुरेखा वडिपार, निलीमा काळे, मंगला झिलपे, मंदा बांगरे, ललीता बरसेट्टीवार, मंदा सोनाखण, सविता ढेपाले, विजयात आगबत्तलवार, निशा उज्वलकर, सुरेखा लोडे, सविता रासेकर यांच्यासह महिला काँग्रेसचे सदस्य उपस्थित होते.

Comments are closed.