झरी तालुक्यातील कोतवालांचे तहसिलदारांना निवेदन

मारेगावातील कोतवालांचे निलंबन मागे घेण्याची मागणी

0

राजू कांबळे, वणी: सध्या फवारणी विषबाधा प्रकरणी मारेगाव तालुक्यातील कोतवालांना आणि पालीस पाटलांना निलंबन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कोतवालांचं निलबंन मागे घ्यावं यासाठी झरी तालुक्यातील कोतवालांनी झरीच्या तहसिलदारांना निवेदन देऊन कोतवालांचं निलंबन मागे घ्यावं अशी मागणी केली आहे.

फवारणी विषबाधा प्रकरणाचा दोष कोतवालांवर ठेवून मारेगावचे तहसिलदार विजय साळवे यांनी 3 कोतवालांना निलंबित केलं आहे. सोबतच 3 पोलीस पाटलांनाही निलंबित करण्यात आलं आहे. शासनाचा दबाव असल्याने अधिका-यांना अभय देत कनिष्ठ कर्मचा-यांंवर कार्यवाही करण्यात येत आहे. ही कार्यवाही अन्यायकारक असून कोतवालांना कामावर रुजू करण्यात यावे अशी मागणी झरी तालुक्यातील कोतवालांनी केली आहे.

निवेदन देते वेळी झरी कोतवाल संघटनेचे अध्यक्ष बाबाराव आडे, उपाध्यक्ष मारोती तिरणकार, सचिव हिरामन गेडाम व सर्व सहकारी कोतवाल उपस्थित होते.

(आपल्या जवळ असणा-या न्यूज किंवा पब्लिश झालेल्या न्यूज संबंधी संपर्क साधू शकता, निकेश जिलठे- संपादक, वणी बहुगुणी 9096133400 )

Leave A Reply

Your email address will not be published.